Corona Vaccine : कोविशिल्ड (Covishield) आणि कोवॅक्सिन (Covaxin) फक्त प्रौढांसाठी वापरण्यासाठी पूर्णपणे अधिकृत केले गेले आहेत आणि ते फक्त 'प्रोग्रामॅटिक सेटिंग' मध्ये वापरले जाऊ शकतात, याचा अर्थ तुम्हाला अजूनही या लसींसाठी कोविन (CoWin) अॅपवर नोंदणी करावी लागेल.
साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन वापरासाठी अधिकृत वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर एक वर्षाहून अधिक काळ लोटल्यावर, या दोन लसींना आता बाजारात विकण्यासाठी परवानगी मिळाली आहे. यामुळे सरकारलाही कोरोना लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करुन ठेवणे गरजेच आहे. प्रशासनाकडे शुक्रवारी सकाळपर्यंत 13 कोटींहून अधिक डोसचा साठा आहे. तुम्ही तुमच्या शेजारच्या केमिस्टकडून कोविड लस खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर त्यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे.